बाबासाहेबांनी सांगितलेल्या ‘शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा’ ह्या मंत्राची माझ्यावर विशेष मोहिनी पडलेली आहे. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे अन ते प्यायलेच पाहिजे, त्यामुळे Higher education घेऊन मोक्याच्या अन माऱ्याच्या जागा मिळवणे हे आजच्या बहुजन विद्यार्थ्यांचे प्रथम ध्येय असले पाहिजे या मताशी मी पूर्ण सहमत आहे. परंतु ‘शिका’ याचा अर्थ केवळ पुस्तकी शिक्षण घ्या असं कदाचित बाबासाहेबांनाही अपेक्षित नसेल. शिका, परंतु अश्या पद्धतीचं शिक्षण घ्या की बदलत्या काळात ते तुम्हाला आत्मविश्वासाने उभं राहण्यास मदत करेन हा त्यामागचा गंभीर विचार लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं.
जे शिक्षण संघटीत होण्याची आपोआपच प्रेरणा देईल असंच शिक्षण घेणं अत्यंत जरुरीचं आहे कारण, त्यामुळेच पुढचा संघर्ष करणं सहज होणार आहे. कदाचित या मुद्द्याला anthropologically समजून घेणं आवश्यक ठरेल. आदिमानवाच्या काळात जेव्हा माणूस एकट्याने राहत होता अन जगण्यासाठी आवश्यक तंत्र त्याला अवगत नव्हती, त्यावेळच्या प्रेरणा काय असतील? अर्थात माणसाने शिकारीच तंत्र ‘शिकलं’ अन त्यातूनच त्याला समूहाने शिकार करण्याचं ‘संघटीतपणाचं’ कौशल्य अवगत झालं अन त्यातूनच आपल्या समूहाचं संरक्षण करण्यासाठी ‘संघर्ष’ करण्याचं भानही त्याला आलं. बाबासाहेब स्वतः जगद् विख्यात anthropologist होते त्यामुळे मानवी प्रवृत्तींचा नेमका अंदाज बांधणं त्यांना सहजशक्य होतं. ‘शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा’ हा मंत्र त्याच प्रगल्भतेतून सुचलेला नसेल का? म्हणून केवळ अक्षरसाक्षर होण्यापलीकडे जाऊन सर्जनशीलतेला आवाहन करणार शिक्षण आज गरजेच आहे...
Comments