top of page
Writer's pictureKaustubh Savatkar

Ohh Fuck!...

एक नामवंत लेखिका... तिची फेसबुक Profile मी अक्षरशः तासभर चाळतोय... एकूण एक पोस्ट, कविता आणि wall वर जे काही म्हणून लिहिता येत ते सगळं... Interestingly, तिच्या मुलीचीही profile बघणं होतं... भरपूर फोटो काढता येण्याइतपत सौंदर्य आणि तिला मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी का? ह्या प्रचंड संभ्रमात अडकलेला मी... च्यामारी, काय आहे हे ???... निर्भय, नितळ मनाने आपण कधी वागू शकत नाही याचा जाम त्रास होतो... लेखिका बहुविध अंगाने लैंगिकतेवरही लिहितात... म्हणून माझ्या मनात का-कू चालू आहे का?... कळायला जाम काही मार्ग नाही... एखाद्याच्या बुद्धीकौशल्यावर, पर्यायाने Intelligence कडे पाहून आकर्षित होणे ह्याला इंग्रजी मध्ये एक काहीतरी जबरा शब्द आहे... तो सध्या मला आठवत नाहीये... Sapiosexual बहुधा... पण अश्या कित्येक आकर्षणांना मी कितीतरी वेळा भुललोय... मोकळ्या मनाने हे कबूलही करता यायला पाहिजे... फ्रॉइड म्हणतो त्याच्यानुसार, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये लैंगिकता आणतो... अन जर ते तसं असेल तर लिंगनिरपेक्ष आणि वेगळं म्हणून अभिव्यक्त होण्याचे मार्ग आपण धुंडाळतो का?...मी धुंडाळतो का?... हे मार्ग सापडले पाहिजेत... त्यावरून चालण्याची बुद्धी आणि हिंमत झाली पाहिजे...अन म्हणून ohh fuck! हे तितक्याच निरागसपणे म्हणता आला पाहिजे...!

Want to read more?

Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.

15 views0 comments

Recent Posts

See All

Deriving from Humour...

अबिश मॅथ्यू आणि कुणाल कामराचा "deconstruction of humour" चा एक video, YouTube वर पाहिला, ज्यात कुणालच्या patriotism and governance च्या...

... مجیب

काही दिवसांपूर्वी माझ्या शेजारच्या एका मुस्लिम परिवाराच्या लग्नाला जाण्याचा योग आला... मज्जाच आली म्हणा... हॉलमध्ये गेल्यानंतर आम्ही...

bottom of page