आज फेसबुकवरच्या बर्याचश्या पोस्ट वाचल्यानंतर एक प्रकर्षाने जाणवलं की काही वर्षांपूर्वी 'महिला दिना'निमित्त असणारा sexual liberation (लैंगिक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती) हा मुद्दा थोडा मागे पडून financial independence (आर्थिक मोकळीक आणि निर्णय क्षमता), physical and emotional safety (शारीरिक आणि भावनिक सुरक्षितता), breaking of glass ceiling (कामाच्या ठिकाणी आभासी प्रगतीच्या संकल्पनेला धक्का), ब्राह्मणी पितृसत्तेने ठरवून दिलेल्या परिमाणांना सोडत देत नव्याने फेमिनिझमची मांडणी करणे असा pendulum शिफ्ट होतोय...
पुरुष म्हणून मिळालेले प्रिव्हिलेज सोडता येतील का आणि gender based equality हा प्रवाह जाईल का हे पाहणं रोचक असणार आहे.. आणि असे कुठले मार्ग शोधता येतील की त्यातून प्रिव्हिलेज सोडता येण्याचं ट्रेनिंग मिळू शकेल..? Empowerment त्यातूनच निर्माण होईल, नाही का?
Comentários