"माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं मी बिनधास्तपणे कसं म्हणू शकतो ? खरंतर हे काहीच नाही...Attraction आणि commitment यामधला झुलता पूल आहे असं म्हण हवंतर. अन त्यावरच हिंदकळत, लोंबत राहायला मला जमतं...अन हे म्हणजे तुझ्याबद्दल वाटणारं "आवडणंच" असावं... आत्यंतिक करुणेसारखं किंवा अपार काळजी करण्यासारखं....कारण त्यात करण्याची काहीतरी उर्मी आहे, शक्ती आहे, इच्छा आणि अभिप्सादेखील आहे...म्हणजे बघ ना..तुझ्या नाकावरचा तो बारीक तीळ, तुझ्या डाव्या गालावरची खळी, तुझ्या किनऱ्या आवाजाचा भास....हे सगळं, आणि हे असं सगळं पाहून मला काय होतं? म्हणजे उठावसं वाटतं अन तुला गच्च-घट्ट मिठीत घ्यावसं वाटतं...जगाच्या नकाशावर नसेल अशा एका नितांत सुंदर बेटावर तू अन मी असेच अंतापर्यंत राहावेत असंसुद्धा वाटतं... ही वाटण्याची उर्मी 'माझं प्रेम
अभिप्सा...
Want to read more?
Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.