काही पुरुष असतातच की स्थितप्रज्ञ... पण कधी कधी परिस्थिती त्यांनाही कळेनाशी होते... नवीन जागी गेल्यावर बावचळून गेल्यासारखं होतं न अगदी तसंच... कदाचित त्यांच्या आयुष्यातलं हे नवं वळणच तर असतं... रात्री जया- अमिताभचा "अभिमान" पाहत बसलो होतो... पत्नीच्या प्रगतीने जळफळाट करून घेणारा नायक... तो तसाच असतो की तसा होतो?... तिच्यावर जीवापाड प्रेम असणारा फक्त तिच्या प्रगतीला पाहून जळफळाट करून घेईन हे मला काही तितकंसं पटत नाही... तिला तो भेटतो, मग भेटत राहतो, तिचा माझ्यावर खूप विश्वास आहे अन तो बरकरार राहण्याची जबाबदारी माझ्यावर आहे हे लक्षात ठेऊन वागतो... तिला आधार देतो, तिच्यातल्या Talent ला ओळखतो, त्याला पैलू पाडतो, तिला प्रेरणा देतो, तिच्या झेपेसाठी तो संपूर्ण आभाळ तयार करतो... तिला मिळालेल्या यशाच्या आनंदात चिंब भिजूनही जातो... तिच्या अभिमानापोटी त्याच्या छातीचा कोट होतो... पण इथूनच सगळ बिथरतं... ती भरारी घेईपर्यंत त्याला एकाच ध्येयाने झपाटलेलं असतं... तिला मोठ्ठ करण्याच्या... अवचितपणे ती तिचा प्रवास सुरु करते अन त्याच्या मिळालेल्या पाठबळावर तर अधिकच जोमाने... कदाचित अधिक वेगानेही...
अभिमान...
Updated: Jun 23, 2021
Want to read more?
Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.