top of page

तू नाकारलेल्या पावसाचे काय मग?...

एक वेळ अशी येऊन गेली तुझ्या आयुष्यात, जेव्हा तुला माझ्यासाठी माझ्याइतकंच वेडं व्हावसं वाटलं... पण माझं दुर्दैव बघ न की तुझा तो वेडेपणा मला उमगला नाही गं... मी माझ्या मनातल्या कित्येक भीतींच्या आवरणांना खरवडून काढण्याचा प्रयत्न करत राहिलो... अन त्या काळात तुझ्या वेडेपणाला माझ्या वेडेपणाचा प्रतिसाद द्यायचं राहून गेलं... हा साकव तुटला आता... ही दरी कशाने भरून काढता येते?... "आता मला तसे आनंद अनुभवता येत नाहीत, असं वाटतंय की माझ्या आयुष्यात प्रेम उरलंच नाहीये..." असं म्हणून गेलीस आज... म्हणून हा उलटा प्रयत्न करून पाहतोय... काही तरी असं घडेल जे मनासारखं असेल ही अत्यंत आशा कोमेजली नाहीये अजून... 'वेळ जाणं' हे उत्तर असू शकेल का गं ह्यावर?... कदाचित बदलत्या वेळेबरोबर येणारे ऋतू नवी बहर घेऊन येतील... तुझ्या-माझ्या प्रेमातला वैशाखवणवा संपावा आता... म्हणूनच मी पावसाची खूप वाट पाहतोय... हा प्रेमाचा पाऊस लवकर पडावा... त्यानं खूप कोसळावं... अन आपण दोघांनी एकमेकांना धरून त्यात चिंब न्हात राहावं... नेहमी... असंच... आठवणींसारखं...!

Want to read more?

Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.

Recent Posts

See All
आठवणींचा कोरोना...

काही बोलू वाटेना, करू वाटेना म्हणून छातीत उमटणारी कळ काय थांबते का?...टोचत राहणारी अखंड आठवण... आपणच कमिटमेंटच्या हातोड्याने घट्ट ठोकून...

 
 
 
हिंदोळा...

आज उशीरा उठलो आणि दुपारभर झोपून ही होतो... अगदी रात्री 8-8:30 ला जाग आली मग बाहेर येऊन बसलो... काय काय विचार येऊन गेले नुसते... आजकाल खूप...

 
 
 
bottom of page