बेल्जियमच्या मॅकलिन मधला आमचा हा दुसरा रविवार... पण गेल्या रविवारी जेट-लॅगमुळे तो दिवस गणतीत धरायलाच नको... आमची शुक्रवारी कोविड टेस्ट झाली आणि शनिवारी निगेटिव्ह रिझल्ट आला.. सो, आता आम्ही मोकळेपणाने इथे फिरू शकतो... मग आजच्या या रविवारी काहीतरी खास करावं असा प्लॅन झाला आणि आम्ही झकास जेवणाचा बेत केला. अमृताच्या एका कलीगला इन्व्हाईट केलं... आबेल वाफुला हा माझा इथे भेटलेला पहिला केनियन दोस्त...आमच्या तारा लगेच जुळल्या कारण साधारण एका वर्षभरापूर्वी मी नेटफ्लिक्सवर "अ बॉय हू हार्नेस्स्ड द विंड" नावाचा सिनेमा पहिला होता... त्यात केनियाच चित्रण, तिथल्या ऊर्जा-प्रश्नांवर काही काम केलेल्या एका लहान मुलाची फँटॅस्टिक कहाणी होती... त्यामुळे आबेलसोबतच्या गप्पांना काही खंड पडला नाही... मग नैरोबीमधलं क्लायमेट, जंगलं आणि बायो-डायव्हर्सिटी, गरिबी आणि स्त्रियांचे प्रश्न अश्या विविध मुद्द्यांवर आम्ही बोलत राहिलो. केनिया मधल्या विवाहपद्धती हा एक अजून इंटरेस्टिंग विषय...
सरतेशेवटी गाडी जेवणावर आली... केनियातल्या स्वाहिली भाषेत फ्लॅट-ब्रेडला चपातीच म्हणतात हे ऐकून अमृताला बराच गोड शॉक बसला... मग आजच्या मेनूसाठी बटाट्याची भाजी, चपाती, डाळ-पालक, जीरा-राईस , बंगाली पद्धतीने करतात ते "बेंगुनी" आणि तुपातला शिरा असा फक्कड प्लॅन execute झाला... जेवण संपताना आबेलच्या आनंदाला लिमिट राहिली नाही... एक तर आपल्यासाठी कोणीतरी इतके पदार्थ केलेत आणि ते ही इतक्या कमी वेळात याबद्धल त्याच आश्चर्य कमी होत नव्हतं... भारतीय जेवणाचं खूप कौतुक झालं मग... हे कसं बनवलं आणि ह्यात काय मसाले आहेत.. बाप रे बाप... पुढच्यावेळी त्याच्या बायकोला घेऊन येण्याचं त्याने कबूल केलंय...
आमच्या दोघांसाठीसुद्धा भिन्न संस्कृतीच्या व्यक्तीसोबत आपली धरोहर आणि पद्धती शेअर करणं हा आनंदाचाच क्षण होता. इथे आल्यानंतरचा एकटेपणा जरा कमी झाला...आणि वीकएंड अतिशय सत्कारणी लागला... मला खरंतर आमच्या दोघांच्याही आयांचे (माई आणि आई) आभार मानायचेत कारण, "जेवण बनवणं" हे एक उत्तम कौशल्य त्यांनी आम्हाला पास-ऑन केलंय...आणि त्यात कुठलाही जेण्डर स्टिरिओटाईप ठेवलेला नाही... ऑनलाईन ऑर्डरींग आणि कधी झालंच तर चिमटीने तांदूळ शिजायला पडण्याच्या काळात मूठभर घेऊन शिजवावं आणि खिलवावं हा त्यांचा गुण जगात भारीच! शेवटी काय तर "दाणे दाणे पे लिखा होता है खाने वाले का नाम", बरोबर ना?
Comments