निरागस...
- Kaustubh Savatkar
- Apr 13, 2013
- 1 min read
आज मित्रासमोर मोठी अडचण होती... तो आज दोन मुलींना भेटला... एक खूप सुंदर होती अन् एक खूप बुद्धिमान... त्याला कळेचना की कोणाला निवडाव ते... मला प्रश्न टाकून तो उत्तराच्या अपेक्षेने माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहिला... मी म्हटलं, "हे बघ, तत्वज्ञानच झाडायचं असेल तर सौंदर्य काही चिरतरुण नसतं... आणि practically बुद्धिमत्ता देखील सदैव चालेलच याचीही शाश्वती नाही... मी असं म्हणेल की पुढच्या पाच वर्षांनंतर तुझ्या बाजूला त्या दोघींमधली कोण उभी राहिलेली तुला आवडेल?....चालेल?....झेपेल?....पटेल?....सहन होईल?....जमवून घेता येईल?...ते बघ...अन् ठरव... "आता मित्रानं वाट बघायची ठरवलंय... वाट बघायची ते योग्य वेळ येण्याची... तोपर्यंत ओठांचा चंबू करून च्यक च्यक आवाज करत तो उभा राहिला... मी मनात म्हटलं, इतक्या निरागस expression ला पाहून जीव हरवून जाणारी भेटू देत तुला फक्त...!
Want to read more?
Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.