एक विचित्र अस्वस्थता आणि हुरहूर लागून राहिलीये तुला भेटून परत आल्यापासून... आणि ह्याआधी असं कध्धीच झालं नाहीये गं... नको वाटतोय आता हा दुरावा... तू सतत माझ्यासोबत होतीस न... त्याची सवयच झाली होती जणू काही... आताही तू घुटमळत राहावंस इथे माझ्या अवतीभोवती असं वाटत राहतं... छोट्या छोट्या कारणांमुळे तुझ्यावर जाम चिडावंसं वाटतं की, का लक्ष देत नाहीयेस माझ्याकडे?... आणि हे खूप नवीन आहे माझ्यासाठी... मला वाटायचं की प्रेमात आपला अहंकार विरून जातो... पण हा नवीनच इगो माझ्यात दिसायला सुरवात झालीये... आधी कित्ती शांतपणे ऐकून घेणारा मी थोडं म्हणता-म्हणता खूप खूप aggresive व्हायला लागलोय... एक प्रकारे मालकीचीच भूमिका गाजवाविशी वाटायला लागलीये... अन हे नकोय असं मला... मी नुसता व्याकूळ होत राहतो... तुला मिस करणं आवडतं मला... पण त्यामुळे चिडचिडण मात्र जीवावर यायला लागलंय... "मिरे, कसं गं प्रेम केलंस तू तुझ्या कृष्णावर?"... तो तर तुझ्या समीपही नव्हता... कालातीत... कित्येक शतकांच्या gap नंतरही तुझी ओढ कमी झाली नाही त्याच्याबद्दल... तुझ्या एकतारी वर नाचत राहिलीस तू... तुझा त्याच्याविषयीचा मोह गळून पडला होता का गं?... की त्याच्या प्रेमात तूच कृष्ण झाली होतीस?...
भेटून परतल्यावर...
Want to read more?
Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.