top of page

मिठीत पडताना...

Updated: Jun 24, 2021

तुला भेटायचा दिवस जसाजसा जवळ येत चाललाय... मी तितकाच बेचैन होत जातोय... काळीज धडधडतंय... आत्ता उडून बाहेर पडेल की काय इतका मोठा कलकलाट सुरु आहे नुसता... अन तुला भेटायचंय म्हणजे तरी नेमकं काय गं?... पुन्हा आपलीच आपल्याशी ओळख... नव्याने... मी कसा आहे हे तुझ्या डोळ्यांतून मला कळणं... तुझ्या स्पर्शातून ते उमगणं... अन खोल आतमध्ये कुठेतरी ते रुजत जाणं... माझी अवस्था आत्ता ना, त्या राधेसारखी झालीये... घाबरलेली... बावरलेली... मी कसा येऊ तुझ्यापुढे?... पुरुषालाही जडतात का ही लाजेकाजेची बंधनं?... चित्याला पाहून सावध झालेल्या कस्तुरीमृगासारखी झालीये माझी अवस्था... पण तरी मिलनाची प्रचंड आसक्ती मनात धरून मी येणाऱ्या वादळाची वाट पाहतोय... काय एकदा तो तुझ्या मिठीत पडेन तेव्हाच हा काळोखाचा आभास मिटेल... मग एकसुरात वाजत राहतील खणखणाऱ्या झांजा... कानामागे आवाज येत राहतील शेकडो घोड्यांच्या टापांचे... छातीत उसळतील हजारो ज्वालामुखी... इतके दिवस धुमसणारे... अन ओंजळीतून फक्त मोगरा सांडावा...!

Want to read more?

Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.

Recent Posts

See All
आठवणींचा कोरोना...

काही बोलू वाटेना, करू वाटेना म्हणून छातीत उमटणारी कळ काय थांबते का?...टोचत राहणारी अखंड आठवण... आपणच कमिटमेंटच्या हातोड्याने घट्ट ठोकून...

 
 
 
हिंदोळा...

आज उशीरा उठलो आणि दुपारभर झोपून ही होतो... अगदी रात्री 8-8:30 ला जाग आली मग बाहेर येऊन बसलो... काय काय विचार येऊन गेले नुसते... आजकाल खूप...

 
 
 
bottom of page