अगदी आत्ता... काही क्षणांपूर्वीचीच घटना... काका घरी उशिरा येणार म्हणून त्यांना आणायला मी पुणे स्टेशनपर्यंत गेलो होतो. मला म्हटले, "साधू वासवानी चौकात थांब. मी पंधराएक मिनिटात येतोच."... रात्रीची ११:३० ची वेळ... एवढ्या मोठ्या त्या चौकात वेगाने धावत जाणाऱ्या तुरळक गाड्यांशिवाय कोणीच नाही... मी गाडी पार्क केली अन उभा राहिलो... इकडे तिकडे नजर फिरवली... समोर उभा साधू वासवाणीचा पुतळा... एक बोट वर करून राहिलेला... अन तितक्यात स्टेशनच्या बाजूने एक स्कूटरवाला आला अन माझ्या डाव्या बाजूला जाऊन कोपऱ्यावर उभा राहिला... नीट पाहिलं तर, एका बाईशी बोलत होता..."नहीं...नहीं...उधर चलने का ज्यादा होता है..." असली काही वाक्यं पुसटशी कानावर पडली... अन "छीनाल है हरामी..!" असं म्हणत त्या स्कूटरचा कर्कश्य आवाज करत निघूनही गेला... हे माझ्या पचनी पडतंय तोपर्यंतच ती बाई माझ्या अगदी समोर येऊन उभी... फिक्कट पिवळ्या रंगाचा ड्रेस, त्यावर पांढऱ्या रंगाची ओढणी, पायात चपला, केस बांधून बसवलेले अन खांद्यावर एक चामडी पिशवी..."बहोत कम बोला भाडखाव!"....सणकन्न कानाखाली बसावी, असं मी भानावर आलो..."थोडा देर और रुकना पडेगा..." असं म्हणता म्हणता तिने माझ्या गाडीवरून हात फिरवला... क्षणभर पाठीच्या मणक्यातून वीज जावी तसा वाटलं... हातांना घाम फुटला... आपण त्यातले नाही हे दाखवायला मी फोन काढून काकांना फोन लावला...
मी त्यातला नाही...मग?
Want to read more?
Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.