top of page
Writer's pictureKaustubh Savatkar

विसरण्याची प्रॅक्टिस...

शाईपेनानं लिहिण्याच्याची मजा काही औरच असते ना...! ती Camel ची बाटली, तो प्लास्टिकचा dropper, शाई भरताना निळे होणारे हात... अन तो शाईचा वास... परिचयाचा अन मुग्ध... आह हा हा... कागदावर शाई फुटत असेल तर होणारी चीडचीड, वहीच्या मागे पेन झटकून झटकून उमटणारी टिंबांची रांगोळी... अन दोन पानांमध्ये शाईमध्ये भिजलेला दोरा ठेऊन काढलेल्या नक्षी... भारी वाटतं ना!... आजकाल key-board typing मध्ये ती मजा हरवत चाललीये... कधी कधी वाटतं, हा बालपणीचा धागा आपल्याला असाच जपून नाही का ठेवता येणार ?... आता मोठे झालोय तर किती अवघड करून ठेवतो आपण गोष्टी... आता गाभुळलेल्या चिंचा अन बोर नाहीत... आपल्या खास मित्राबरोबर हुंदडणं नाही, लगोरी नाही, आट्यापाट्या नाही... की 'तिच्या'साठी फुलपाखरांमागे धावणं नाही... आता आहेत ते phone calls अन text messages तरीपण दर पंधरा मिनिटांनंतर, "बरं, अजून काय मग?" असं विचारावं लागतं...Practical राहण्याच्या नादात आपलं टाळ्या देत खिदळणं का हरवतं?... आता त्या झप्प्या नाहीत अन सूर्यास्त पाहताना तिच्या कमरेभोवती हात गुंफणं नाही... कधी कधी गोष्टी समजून घ्यायलाच नको असतात... कारण समजून घेणं जितकं जास्त तितकं आपलं उध्वस्त होणं जास्त असतं... अन कमाल गोष्ट म्हणजे हे करताना Shift+Delete करताच येत नाही...!

Want to read more?

Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.

3 views0 comments

Recent Posts

See All

आठवणींचा कोरोना...

काही बोलू वाटेना, करू वाटेना म्हणून छातीत उमटणारी कळ काय थांबते का?...टोचत राहणारी अखंड आठवण... आपणच कमिटमेंटच्या हातोड्याने घट्ट ठोकून...

हिंदोळा...

आज उशीरा उठलो आणि दुपारभर झोपून ही होतो... अगदी रात्री 8-8:30 ला जाग आली मग बाहेर येऊन बसलो... काय काय विचार येऊन गेले नुसते... आजकाल खूप...

bottom of page