Mastrubation चे काही नियम असतात... पण मी ते पाळत नाही... तशी त्याची जरुरही नसते... फक्त तुझं माझ्याबरोबर असणं महत्वाचं नाही का ?... मला त्यातच मजा आहे... हे म्हणजे नेहमीपेक्षा वेगळ असतं... धसमुसळेपणा नाही... की शरीराला आचके नाहीत... हळूहळू... तरंगत राहिल्यासारख... स्वतःला झोकून दिल्यासारखं... तिथे मला control नकोय...माझाही... तिथ तुझा गंध आहे नुसता... तुझे स्पर्श... तू गळ्यात टाकलेले हात अन् चेहराभर पसरवलेले तुझे केस... त्या स्पर्शाचही एक वेगळं texture...कपाळापासून सुरवात करत खाली येतेस... पापण्या, गाल, नाक, हनुवटी... एकही जागा सोडत नाहीस... पण ओठांकडे तुझं दुर्लक्ष होतं... चुकून की जाणून बुजून?... मला कळत नाही तुझं हे... साखरेचा थेंब ओठांवरून ओघळेल म्हणून मी आसुसलेला पण तितक्यात माझ्या कॉलर बोनवरच्या तिळावर तू जिभेचं टोक टेकवतेस... मी सुख होऊन तुला धन्यवाद देतो... हे अनोळखे प्रदेश... कित्येक वेळेला सफर केलेले... डाव बरोबरीत कसा सोडवायचा हे तुला perfect कळतं... शेकडो मैल दूर आहेस माझ्यापासून... आता तर चंद्राची सावलीही माझ्या शेजेला उजळ करते आहे... अन् बेडशीटवर एक चुणी देखील पडत नाही...!
शेजसोबती...
Want to read more?
Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.